Advertisement

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ED कडून अटक करण्यात आलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. 

यासोबतच सोमवारी 11.30 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

ट्विटमध्ये किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे की, संजय राऊतनं अनेक लोकांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. आज त्यांनाच इडीकडून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. 

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. रविवारी सकाळी ७ वाजता ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता.

नऊ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. मात्र, संजय राऊत यांना घेऊन जात असताना संजय राऊत यांच्या आईंचे अश्रू अनावर झाले होते. तसेच त्यांच्या परिवारातील इतर सदस्यदेखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

संजय राऊत यांनी देखील या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली. “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.”, असं ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांना काही तासांपूर्वी ईडीने ताब्यात घेतले आहे.

आता त्यांच्याविरोधात व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा