Advertisement

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडीच्या कोठडीत वाढ

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडीच्या कोठडीत वाढ
FILE PHOTO
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन्स कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती.त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.

पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ईडीने या प्रकरणी मंगळवारी दोन ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. रोख रकमेच्या व्यवहारांबाबत पुरावे गोळा करण्यासाठी ही शोध मोहीम राबवली होती. लवकरच या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे.

ईडी’ने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता ‘एचडीआयएल’कडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे ११२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे दिसून आले होते. ही रक्कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली.

यातील एक कोटी सहा लाख ४४ हजार ३७५ रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना देण्यात आले. त्यातील ५५ लाख रुपये २००९-२०१० मध्ये कर्जाच्या (असुरक्षित) स्वरूपात वर्षां राऊत यांना मिळाले. त्यातून एक सदनिका खरेदी करण्यात आली.

याशिवाय प्रवीण राऊतचे व्यावसायिक संबंध असलेल्या प्रथमेश डेव्हलपर्स यांच्यामार्फत वर्षां राऊत आणि संजय राऊत यांना ३७ लाख ५० हजार रुपयांचा फायदा मिळाला. त्यासाठी वर्षां आणि संजय राऊत यांनी अनुक्रमे १२ लाख ४० हजार व १७ लाख १० रुपये गुंतवणूक केली होती.हेही वाचा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवारी सुनावणी

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ रविवारपूर्वी होण्याची शक्यता : दीपक केसरकर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा