ईडी अजित पवारांची चौकशी करणार?

  Mumbai
  ईडी अजित पवारांची चौकशी करणार?
  मुंबई  -  

  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 1000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाकडून लवकरच अजित पवार यांची चौकशी केली जाऊ शकते. याप्रकरणी ईडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडून घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे मागवली आहेत. सिंचन प्रकल्पांची कंत्राटं देण्यात आलेल्या राज प्रमोटर्स आणि सिविल इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपन्या अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

  सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही महिन्यांपूर्वी चौकशी केली होती. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली होती. आता ईडीने याप्रकरणी एसीबीकडे घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे मागवली आहेत. त्यामुळे अजित पवार यांची पुन्हा चौकशी होणार हे निश्चित झाल्याने अजित पवार पुन्हा अडचणीत येऊ शकतात. सहा महिन्यांपूर्वी 10 कोटी रुपयांना खरेदी केलेली संपत्ती 100 कोटी रुपयांना विकल्याच्या प्रकरणीही ईडी अजित पवार यांची चौकशी करणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.