Advertisement

संजय राऊत यांना अटक होणार?

संजय राऊतांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्या चौकशीची शक्यता आहे.

संजय राऊत यांना अटक होणार?
SHARES

संजय राऊतांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्या चौकशीची शक्यता आहे. संजय राऊतांच्या भांडुपच्या घरी ईडी पथक दाखल झालं आहे. यामुळे आता राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जोपर्यंत ईडीचं पथक चौकशीसाठी राऊतांच्या घरी असेल तोपर्यंत चोख बंदोबस्त याठिकाणी असणार आहे. सकाळी साडेसात वाजता पथक राऊतांच्या घरी पोहोचलं आहे. पत्राचाळ प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी केली जाऊ शकते. संपत्तीच्या स्त्रोताबद्दलही त्यांना अनेकदा विचारण्यात आलं होतं. राऊत आणि कुटुंबीय सध्या घरीच आहेत.

संजय राऊत सहकार्य करत नसल्यानं त्यांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालं आहे. याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे.

संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरू राहणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रकमेच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचं पथक संजय राऊत यांची चौकशी करत आहे. त्यांना ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावलं होतं. मात्र, तो अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाहीत. यानंतर आज सकाळी साडेसात वाजता ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झाल्याने त्यांचे समर्थक घोषणाबाजी करत आहे. संजय राऊत आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, असं हे शिवसैनिक म्हणताना दिसत आहेत. यामुळे राऊतांच्या घराबाहेर CISF बंदोबस्त तैनात आहे.



हेही वाचा

'गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही'- भगतसिंह कोश्यारींया

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा