शिवेसना-काँग्रेसमध्ये व्हॅलेंटाईनचं नातं?

 Dadar
शिवेसना-काँग्रेसमध्ये व्हॅलेंटाईनचं नातं?
Dadar , Mumbai  -  

मुंबई - शिवसेना-काँग्रेसमध्ये व्हॅलेंटाईनं फिक्स असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेवर केला आहे. काँग्रेसने शिवसेनेकडून 10 जागा गिफ्ट घेतल्या आहेत, तर शिवसेनेने काँग्रेसकडून 40 जागेसाठी व्हेलेंटाईन गिफ्ट घेतल्याचा आरोप तावडेंनी केला. या 50 जागांवर या दोन्ही पक्षांनी अभद्र युती केल्याचा आरोप तावडेंनी शिवसेना आणि काँग्रेसवर केला.

तसेच ज्यांनी व्हेलेंटाईन डेच्या दिवशी आर्चिसचे दुकाने फोडले आता त्यांना अशा प्रकारचे व्हेलेंटाईन गिफ्ट कसे काय चालते असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. हे सरकार पाच वर्षे चालेल आणि मध्यवर्ती निवडणुका झाल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचाच पराभव होईल इतका भ्रष्टाचार या दोन्ही पक्षांनी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Loading Comments