Advertisement

राजीनाम्यानंतर खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर प्रहार…

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

राजीनाम्यानंतर खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर प्रहार…
SHARES

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पक्षाने मला आजपर्यंत भरपूर दिलं. पण मी माझी तक्रार वारंवार बोलून दाखवल्यानंतरही मला न्याय मिळाला नाही. मी इतर कुणावरही नाही, तर केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली कैफीयत सर्वांसमोर मांडली. ते म्हणाले, पक्षाने मला भरपूर काही दिलं. परंतु याच पक्षासाठी मी उभं आयुष्य खर्ची घातलं, लोकांचे दगड, धोंडे खाल्ले, कुणी थुंकलं, वाळीत टाकलं अशा अवस्थेतही मी ४० वर्षे पक्ष वाढवण्याचं काम केलं. (eknath khadse slams devendra fadnavis after quit bjp maharashtra)

हेही वाचा - ठरलं एकदाचं! खडसेंचा राष्ट्रवादीत ‘या’ दिवशी प्रवेश

परंतु देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यामागे भूखंड घोटाळा प्रकरणात चौकशी लावली, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना कुणीही माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नसताना माझ्याकडून राजीनामा घेण्यात आला. माझ्यावर विनयभंगाचा खटला चालवण्यात आला. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ती महिला गोंधळ घालत असल्याने प्रसारमाध्यमांवर हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. त्यामुळे नाईलाजाने निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. इतक्या खालच्या थराचं राजकारण झालं, यापेक्षा मरण परवडलं असतं. या सगळ्यातून मी सहीसलामत सुटलो नाहीतर बदनामी घेऊन जगावं लागलं असतं, अशी व्यथा एकनाथ खडसे यांनी मांडली.

एवढं कमी की काय माझ्यावर आणि कथित पीएवर ९ महिने पाळत ठेवण्यात आली. या काळात खूप मनस्ताप झाला. तरीही मी ४ वर्षे काढली. आयुष्यात मी जी पदं मिळवली, ती स्वत:च्या जिद्दीवर मिळवली आहेत. परंतु सध्या जी लोकं विविध पदावर आहेत त्यांचं भाजपासाठी काय योगदान आहे? असा प्रश्न देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. 

मी माझी तक्रार वारंवार बोलून दाखवलेली आहे. परंतु मला न्याय मिळालेला नाही. चंद्रकांत पाटील वगळता मला कोणत्याही भाजपा नेत्याचा मनधरणीसाठी फोन आला नव्हता. म्हणूनच मी स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला असून जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

हेही वाचा - खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर फडणवीस म्हणाले…


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा