Advertisement

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर फडणवीस म्हणाले…

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासंदर्भात विधानसभनेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर फडणवीस म्हणाले…
SHARES

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. त्यांच्यासोबत भाजपचे आणखी काही नेते राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याचं समजताच भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. या प्रवेशासंदर्भात विधानसभनेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला की नाही, याविषयी अजूनपर्यंत माझ्याकडे अधिकृत माहिती आलेली नाही. जर त्यांनी राजीनामा दिला असेल, तर त्यावर प्रदेशाध्यक्ष काय तो निर्णय घेतील, हा त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आधीच खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे खडसेंना थांबवण्याचा प्रयत्न ते करतील की नाही, यावर तेच अधिक बोलू शकतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. (maharashtra opposition leader devendra fadnavis reaction on eknath khadse to joining ncp)

एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. एकनाथ खडसे यांनी सकाळीच पक्षाचा राजीनामा दिल्याचं आम्हाला सांगितलेलं असल्याने त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. शिवाय खडसे यांच्यासोबत भाजपमधील १० ते १२ आमदार आणि काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पुन्हा निवडणुका घेणं अडचणीच असल्याने या आमदार आणि नेत्यांना हळुहळू पण सर्वांसमक्ष प्रवेश देण्यात येईल, असं सांगत जयंत पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.


हेही वाचा - 

ठरलं एकदाचं! खडसेंचा राष्ट्रवादीत ‘या’ दिवशी प्रवेश

स्वत:ला इतके मोठे नेते समजता, तर कोल्हापूरातून का नाही लढला? - एकनाथ खडसे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा