Advertisement

भाजपसोबत गेलो नाही तर... आणि एकनाथ शिंदे रडायला लागले : आदित्य ठाकरे

बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत, आदित्य ठाकरेंनी गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.

भाजपसोबत गेलो नाही तर... आणि एकनाथ शिंदे रडायला लागले : आदित्य ठाकरे
SHARES

'एकनाथ शिंदे यांनी बंड का केला, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'भाजपबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, असं सांगत एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले होते, असा खुलासाच आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

जवळपास 9 महिन्याआधी 40 आमदारांसह बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत, आदित्य ठाकरेंनी गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.

हैदराबादच्या गितम विद्यापीठाने आयोजित कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी हा आरोप केला. आदित्य ठाकरे यांच्या विधानानतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

'ते 40 जण स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले. केंद्रीय यंत्रणेकडून अटक होणार म्हणून विद्यमान मुख्यमंत्री तर आमच्या घरी येऊन रडले होते. त्यांनी सांगितलं जर मी भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असा खुलासा आदित्य ठाकरेंनी केला.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी शिंदेंवर प्रहार केला. तर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी आदित्यच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मात्र शिंदे रडत नाहीत, तर नेहमी हसत असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.

'आदित्य ठाकरे लहान आहेत' -एकनाथ शिंदे

आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केवळ दोन वाक्यात आदित्य ठाकरेंचा अपमान केला आहे. आदित्य ठाकरेंकडे कुठे लक्ष देता, ते जाऊ द्या रे. ते लहान असल्याची टीका त्यांनी केली.



हेही वाचा

बाबरी पडली तेव्हा कुठे होते? आता उंदरांसारखे बाहेर येत आहेत : उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवनची उभारणी अयोध्येत होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा