Advertisement

शिंदे गट दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार

प्रत्येक वार्ड मध्ये एक कार्यालय उघडण्याची देखील योजना आहे.

शिंदे गट दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार
SHARES

शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन (Shiv Sena) उभारण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये वेगळं कार्यालय उभारण्यात येणार आहे.

दादरमध्ये आपल्या पक्षाचं प्रशस्त कार्यालय असावं, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील जनता त्यांच्यावर उदंड प्रेम करत आहेत. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना समर्थन दर्शविण्यासाठी अनेक लोक त्यांना भेटत आहे. सर्वसामान्य नागरिक त्यांचे प्रश्न घेऊन ते एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईला येत आहेत. अशा हजारो नागरिकांना भेटण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागात एखादं प्रशस्त कार्यालय हवं, असा मानस एकनाथ शिंदे यांचा आहे. लवकरच त्या दिशेने पावलं टाकली जातील, अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.

मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. याबरोबरच मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये असंच एक कार्यालय उभारण्यात येणार आहे.

येत्या 15 दिवसांमध्ये या कार्यालयाचं उद्घटान होणार आहे. मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरवणकर यांनी दिलीय.

या कार्यालयांसाठी जागा निश्चित झाल्या असून त्या- त्या प्रभागातील शाखाप्रमुख नागरिकांच्या समस्या सोडवतील. शिवसेनेचे नेते देखील या कार्यालयांतून नागरिकांच्या समस्या समजून घेतील आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती सरवणकर यांनी दिलीय.

दादर हा मुंबईचा मध्यवर्ती भाग आहे. याच ठिकाणी शिवतीर्थ आहे तसेच बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे. शिवसेनेच्या सहा दशकांच्या आठवणी या दादरशी, शिवाजी पार्काशी निगडित आहे. याच ठिकाणी शिंदे गटाचं नवं कार्यालय उभे करण्याच्या हालचाली आहेत.



हेही वाचा

बुलेट ट्रेनचा 25% खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा