• आमदार लागले कामाला
  • आमदार लागले कामाला
  • आमदार लागले कामाला
  • आमदार लागले कामाला
SHARE

भरडवाडी - अंधेरी पश्चिमेला असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या संत रामदास क्रीडांगणाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. नशेखोर, गर्दुल्ल्यांनी जणू हे मैदान ताब्यातच घेतलं होतं.

भीतीमुळं इथं कुणीही जात नव्हतं. दुरुस्तीसाठी तक्रार करूनही स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नव्हती. अखेर महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम जागे झाले आहेत. त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पार्कची भरणी आणि दुरुस्तीचं काम जोमानं सुरू केल्यानं स्थानिक आणि जनतेमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. के/पश्चिम विभागात पक्षाचं वर्चस्व कायम राखण्यासाठी आमदार अमित साटम कामाला लागले आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या