Advertisement

ठाकरे गटाची 'मशाल' पेटणार! निवडणूक आयोगाकडून 'या' नावाला मंजूरी


ठाकरे गटाची 'मशाल' पेटणार! निवडणूक आयोगाकडून 'या' नावाला मंजूरी
SHARES

उद्धव ठाकरे गटाला शिवसेना 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. 

दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने हे देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. 

पहिल्याच राजकीय डावपेचामध्ये उद्धव ठाकरे जिंकल्याचं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना या तिन्ही नावांचा समावेश आहे असंही ते म्हणाले. 


हेही वाचा

ढाल-तलवार, इंजिन ते धनुष्यबाण, 'असा' आहे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा