Advertisement

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना निवडणूक आयोगाची नोटीस

सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तक्रार केली. पण निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांनाच नोटीस बजावली.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना निवडणूक आयोगाची नोटीस
SHARES

निवडणूक आयोगाने काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यात निवडणुकीसंदर्भात बैठका घेत आहेत. यातून आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार सावंत यांनी केली होती. याप्रकरणी निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांना नोटीस बजावली आहे.

सावंत यांना 22 रोजी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सातत्याने राजकीय बैठका सुरू आहेत. या बैठका तात्काळ थांबवाव्यात, हे आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे सचिन सावंत म्हणाले होते. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सावंत यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्य निवडणूक आयोग एस चोक्कलिंगम यांनी त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. आता खुद्द निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हेही वाचा

उत्तर मुंबई लोकसभेसाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल

स्मार्ट व्होटर स्लिप वापरणारे जळगाव ठरले पहिले राज्य

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा