Advertisement

राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलली, पण महाराष्ट्रातील 'हे' सदस्य आले बिनविरोध निवडून

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission) राज्यसभेच्या १८ जागांसाठीची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. २६ मार्चला ७ राज्यांमध्ये ही निवडणूक होणार होती.

राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलली, पण महाराष्ट्रातील 'हे' सदस्य आले बिनविरोध निवडून
SHARES

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission) राज्यसभेच्या १८ जागांसाठीची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. २६ मार्चला ७ राज्यांमध्ये ही निवडणूक होणार होती. 

संसदेचं स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत (rajya sabha election) एकूण १७ राज्यांतील ५५ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये  संपत आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५५ जागांसाठी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. ६ मार्चला निवडणूक अधिसूचना देखील काढण्यात आली होती. या अधिसूचनेप्रमाणे २६ मार्चला सकाळी ९ ते  दुपारी ४ वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार होतं. तर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होणार होता. 

हेही वाचा - एक अर्ज अवैध झाल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध

महत्त्वाचं म्हणजे राज्यसभेच्या या ५५ जागांपैकी ३७ जागांसाठी केवळ एकच उमेदवार असल्याने या जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे ७ राज्यातील उरलेल्या १८ जागांसाठीच ही निवडणूक घेण्यात येणार होती.

या वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील शरद पवार यांच्यासोबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, शिवसेनेचे खा. राजकुमार धूत, भाजपचे खा. अमर साबळे, भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष खा. संजय काकडे, राष्ट्रवादीचे खा. माजिद मेनन अशा एकूण ७ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपत आहे. 

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांपैकी २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी १ जागेवर तर भाजपनं ३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. या ७ जागांसाठी एकूण ८ उमेदवारी अर्ज आले होते. परंतु राजेंद्र चव्हाण नावाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने केवळ ७ उमेदवारच रिंगणात शिल्लक राहिल्याने हे सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 

राष्ट्रवादीचे शरद पवार आणि फौजिया खान, भाजपाचे उदयनराजे भोसले आणि डॉ. भागवत कराड, रिपाइंचे रामदास आठवले, काँग्रेसचे राजीव सातव तसंच शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी हे ७ सदस्य थेट राज्यसभेत जाणार आहेत. 

हेही वाचा - EMI ची वसुली तात्पुरती थांबवा - अशोक चव्हाण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा