Advertisement

PMC बँक घोटाळाः ईडीचा आमदार हितेंद्र ठाकूरांच्या ६ ठिकाणांवर छापा


PMC बँक घोटाळाः ईडीचा आमदार हितेंद्र ठाकूरांच्या ६ ठिकाणांवर छापा
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँक (PMC Bank) घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने (ईडी) शुक्रवारी मीरा भायंदर, वसई-विरार परिसरात छापे टाकले. टीम वीवा ग्रुपचे मालक आणि आमदार हितेंद्र ठाकूर आणि जयेंद्र उर्फ भाई ठाकुर यांच्या ६ ठिकाणांवर ईडीने छापा टाकला आहे. छापेमारी केली. 

अटक असलेला आरोपी प्रवीण राउत आणि ठाकूर  कुटुंबात पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हे छापे टाकण्यात आले. विरार पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील विवा सुपर मार्केटमधील विवा ग्रुपच्या कार्यालयात ईडीने चौकशी केली. यावेळी  प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर एसआरपी तैनात करण्यात आली होती. 

वीवा ग्रुप आणि याच्या समूह कंपन्या हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडून चालवल्या जातात. हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी या पक्षाचे अध्यक्ष आहेत. २०१९  च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास अाघाडीमधून राजेश रघुनाथ पाटील, क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर आमदार झाले आहेत. वसई विरार महानगर पालिकेवरही हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास अघाडीची सत्ता आहे.हेही वाचा -

मध्य रेल्वे सुरू करणार 'डिजीलॉकर' सुविधा

लसीकरणानंतर मद्यपान न करण्याचा सल्ला, डॉक्टरांमध्ये संभ्रमRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा