Advertisement

आणखी एक माजी मुख्यमंत्री इडीच्या रडारवर


आणखी एक माजी मुख्यमंत्री इडीच्या रडारवर
SHARES

मुंबई - मनी लाँडरिंग आणि अवैध मलमत्तेप्रकरणी एका माजी मुख्यमंत्र्यांभोवती इडीनं फास आवळल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच सक्तवसुली संचालनालयानं (इडी) आणखी एका माजी मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांमागे तपास आणि चौकशीची ससेमिरा सुरू केला आहे. दरम्यान तपास सुरू असल्यानं, मंत्र्यांची नावे उघड करण्यास इडीनं नकार दिला आहे.

याप्रकरणी सखोल तपास आणि चौकशीअंती योग्य ती माहिती देण्यात येईल, असं इडीतील सूत्रांनी सांगितलं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मोठ्या प्रमाणांत मनी लाॅडरिंग आणि अवैध मालमत्ता गोळा केल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावर तपास करण्यासही इडीनं सुरुवात केली होती. तपासासाठी इडीनं एकूण तीन टीम स्थापन केल्या असून दोन माजी मुख्यमंत्र्यांसह तीन माजी मंत्री इडीच्या रडारवर आहेत. यातील दोन माजी मुख्यमंत्र्यांनी अवैध कंपन्या स्थापन करून सर्व पैसा हा परदेशांतून वळवून कुंटुबातल्या सदस्यांच्या नावावर करण्यात आल्याचा (मनी लाँडरिंग) संशय ईडीला आहे, तर एका माजी मुख्यमंत्र्यांनी मुली, पत्नी आणि सासूच्या नावांवर बेनामी संपत्ती गोळा करत, अनेक कंपन्या स्थापन केल्याची माहिती इडीला मिळाल्याचं समजतंय. तर तीन माजी मंत्र्यांनी सरकारी कंत्राटं देण्यासाठी निविदांमध्ये फेरफार करत, अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या असून. या सर्व कंपन्या सिंगापूर, टेक्सास आणि मेक्सिकोसारख्या देशांत असल्याची माहितीही समोर आली आहे.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा