नगरसेवक नसतानाही करोडोंची मालमत्ता!

  Mumbai
  नगरसेवक नसतानाही करोडोंची मालमत्ता!
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या नगरसेवकांच्या उत्पनाच्या लेखाजोखा मांडताना कोणत्या नगरसेवकांने पाच वर्षांत कितीची माया कमावली आहे, याची चर्चा जोरात सुरु आहे. परंतु या निवडणुकीत उतरलेल्या माजी नगरसेवकांची कमाईही अपेक्षेप्रमाणे वाढलेली आहे. निवडणूक न लढवताही अनेक माजी नगरसेवकांचा आणि उमेदवारांचा उत्पन्न वाढलेले पाहायला मिळत आहे.

  मागील महापालिका निवडणुकीत आरक्षणामुळे निवडणूक लढवता न आलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शुभदा गुडेकर यांच्या उत्पन्नात तीन वर्षात ३२ लाखांनी वाढ झालेली आहे. कोणताही व्यवसाय नसलेल्या गुडेकर यांचे उत्तन्न २०१४ च्या निवडणुकीत १ कोटी ३४ लाख होते, पण सध्या त्यांचे उत्पन्न हे १ कोटी ६१ लाख एवढे आहे. तर शिवसेनेच्या प्रभाग १६ मधील उमेदवार प्रिती दांडेकर यांचे उत्पन्न पाच वर्षांत चार कोटींनी वाढले आहे. दांडेकर यांनी २०१२ मध्ये प्रथम निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे उत्पन्न हे ७८ लाख होते, तर सध्या त्यांचे उत्पन्न हे ४ कोटी ८८ लाख रुपये इतके दर्शवले आहे. भाजपाच्या माजी नगरसेविका दक्षा पटेल या २००२ मध्ये नगरसेविका होत्या. त्यानंतर २००७ मध्ये त्या निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा पराभव झाला. परंतु आता त्या पुन्हा निवडणूक रिंगणात असून, मागील दहा वर्षाच्या तुलनेत नगरसेवक पद नसताना शहा यांच्यानावावर ३ कोटी ३८ लाख रुपयांची मालमत्ता आहे. सन २००७ मध्ये त्यांची मालमत्ता १ लाख ५० हजार एवढी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगसेवक अजित रावराणे यांची मालमत्ता तीन वर्षात ८४ लाखांनी वाढलेली पाहायला मिळत आहे. २०१४ मध्ये त्यांची मालमत्ता ६ लाख ९४ हजार होती, परंतु आता त्यांनी ९० लाख ४७ हजार एवढी मालमत्ता दर्शवली आहे. भाजपात गेलेल्या मुरजी पटेल यांच्या उत्पनातही दहा वर्षात पावणे पाच कोटींनी वाढ झाली आहे. २००७ च्या महापालिका निवडणुकीत मुरजी पटेल यांचे उत्पन्न ह ६२ लाख ५८ हजार रुपये एवढे होते, पण सध्या त्यांनी ५ कोटी ५२ लाख रुपये एवढे उत्पन्न दाखवले आहे.

  या माजी नगरसेवकांची संपत्ती वाढली

  अनिषा माजगावकर- मनसे

  उत्पन्न २०१२ : २५ लाख २७ हजार रुपये

  उत्पन्न २०१७ : ९४ लाख २४ हजार रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : ७१ लाख रुपये

  रमेश कोरगावकर - शिवसेना

  उत्पन्न २०१२ : १ कोटी ५५ लाख रुपये

  उत्पन्न २०१७ : २ कोटी ८४ लाख रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : १ कोटी २९ लाख रुपये

  मकरंद नार्वेकर-भाजपा

  उत्पन्न २०१२ : ३ कोटी ६७ लाख रुपये

  उत्पन्न २०१७ : ६ कोटी ३२ लाख रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : २ कोटी ६५ लाख रुपये

  समिता कांबळे-भाजपा

  उत्पन्न २०१२ : ५५ लाख ९ हजार रुपये

  उत्पन्न २०१७ : १ कोटी ८५ लाख रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : १ कोटी ३० लाख रुपये

  राम बारोट –भाजपा

  उत्पन्न २०१२ : ३ कोटी ३६ लाख रुपये

  उत्पन्न २०१७ : ४ कोटी ६६ लाख रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : १ कोटी ३० लाख रुपये

  स्नेहा झगडे- काँग्रेस

  उत्पन्न २०१२ : ७५ हजार रुपये

  उत्पन्न २०१७ : १२ लाख ३१ हजार रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : ११ लाख रुपये

  विनोद शेलार-भाजपा

  उत्पन्न २०१२ : ५७ लाख २६ हजार रुपये

  उत्पन्न २०१७ : १ कोटी ८८ लाख रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : १ कोटी ३० लाख रुपये

  किरण पटेल – काँग्रेस

  उत्पन्न २०१२ : ६३ लाख ८९ हजार रुपये

  उत्पन्न २०१७ : १ कोटी ३९ लाख रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : ६१ लाख रुपये

  जोत्स्ना दिघे –काँग्रेस

  उत्पन्न २०१२ : ९६ लाख रुपये

  उत्पन्न २०१७ : १ कोटी ४५ लाख रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : ५० लाख रुपये

  वनिता मारुचा- काँग्रेस

  उत्पन्न २०१२ : १२ लाख रुपये

  उत्पन्न २०१७ : ५४ लाख रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : ४० लाख रुपये

  उज्ज्वला मोडक – भाजपा

  उत्पन्न २०१२ : ५१ लाख् ८२ हजार रुपये

  उत्पन्न २०१७ : ६१ लाख ७९ हजार रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : १० लाख रुपये

  अलका केरकर –भाजपा

  उत्पन्न २०१२ : ४ कोटी ९३ लाख रुपये

  उत्पन्न २०१७ : ५ कोटी ३७लाख् रुपये

  पाच वर्षातील वाढीव उत्पन्न : ४० लाख रुपये

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.