Advertisement

माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचे निधन


माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचे निधन
SHARES

मुंबईच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका शैलजा गिरकर यांचे रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या.

शनिवारी छातीत दुखत असल्याने त्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. विद्यमान आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले असून महापालिकेतील अभ्यासू नगरसेविका अशी त्यांची ओळख होती.

कांदिवली पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक 21 मधून त्या निवडून आल्या होत्या. 1997 ते आजवर त्या 5 वेळा नगरसेविका म्हणून भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. 1997, 2002, 2007, 2012 आणि 2017 अशी कारकीर्द लाभलेल्या शैलजा गिरकर यांचा दांडगा जनसंपर्क होता. शिक्षण समिती अध्यक्षा तसेच महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा म्हणून त्यांची कामगिरी चांगली होती. सध्या त्या स्थायी समितीच्या सदस्या होत्या.

दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा