शिवसेना विभाग प्रमुख शशिकांत सावंत यांचे निधन

 Pratiksha Nagar
शिवसेना विभाग प्रमुख शशिकांत सावंत यांचे निधन

सायन- कोळीवाडा विभागाचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख शशिकांत सावंत यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री उशीरा निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. सायन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेली 30 वर्षे ते राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. 2005 साली सावंत यांची 166 क्रमांकाच्या शाखेत विभागप्रमुखपदी निवड झाली होती. शाखाप्रमुख, उपविभाग आणि विभागप्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास होता. शशिकांत सावंत यांचा समाजकार्यात देखील मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे सायन कोळीवाडा परिसर बंद ठेवण्यात आला होता.

Loading Comments