विजय जाधव यांचे विधान भवनावरील आंदोलन फसले

 Vidhan Bhavan
विजय जाधव यांचे विधान भवनावरील आंदोलन फसले
Vidhan Bhavan, Mumbai  -  

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणारे शेतकरी विजय जाधव यांना शनिवारी रात्री मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी विधान भवनासमोर विजय जाधव हे निदर्शन करणार होते. मात्र आझाद मैदानात आंदोलन करण्याच्या अटीवर विजय जाधव यांना सोडून देण्यात आले. सध्या आझाद मैदानात पोलिसांच्या देखरेखीत विजय जाधव आंदोलन करत आहेत. नाशिक येथे शिवसेनेच्या शेतकरी अधिवेशनात विजय जाधव अस्थी कलश घेऊन सामील झाले होते.

यासंदर्भात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी पोलिसांकडून माहिती घेऊ आणि अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहाला विजय जाधव यांच्याबाबत माहिती देऊ असे उत्तर दिले.

Loading Comments