Advertisement

शेतकऱ्यांचा लाँग मार्च रात्रीच आझाद मैदानात!


शेतकऱ्यांचा लाँग मार्च रात्रीच आझाद मैदानात!
SHARES
डाव्या पक्षांच्या किसान लाँग मार्चमुळे सोमवारी जनजीवन विस्कळीत होण्याची भीती लक्षात घेत सर्व मोर्चेकऱ्यांना रविवारी रात्रीच आझाद मैदानाच्या दिशेन कूच करून तिथे त्यांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावीच्या मुलांची परीक्षा आणि मुंबईकरांचे होणारे हाल लक्षात घेता सरकारने या मोर्चेकऱ्यांना रविवारी रात्रीच आझाद मैदानात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.



जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून

संपूर्ण कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी मंगळवारी नाशिकहून निघालेला महाराष्ट्र किसान सभेचा लाँगमार्च रविवारी संध्याकाळी शीव येथील सोमय्या मैदानापर्यंत पोहोचला. शेतकऱ्यांच्या या लाँगमार्चला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हा लाँगमार्च सोमवारी दुपारी मंत्रालयावर मोठ्या संख्येने धडकणार आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या विशाल मोर्चामुळे संपूर्ण दिवसभर जनजीवन विस्कळीत झाल्याचा अनुभव गाठिशी असल्यामुळे शेतकऱ्यांचा हा मोर्चा सोमवारी निघण्याऐवजी रविवारी रात्रीच आझाद मैदानात पोहोचला.


विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता

सर्व मोर्चेकरी हे आझाद मैदानात बसतील आणि सकाळी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल. त्यामुळे सोमवारी मुंबईकरांना तसेच दहावीच्या मुलांना कोणताही त्रास होणार नाही, असा विचार करून मोर्चेकऱ्यांनी हे मान्य केल्याचं समजतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा