Advertisement

घरेलू कामगारांच्या हक्कासाठी पुढाकार


घरेलू कामगारांच्या हक्कासाठी पुढाकार
SHARES

गोरेगाव - महाराष्ट्र घरेलू कामगार युनियनने महिला कामगाराची भेट घेऊन त्यांच्या हक्काची माहिती देण्याचं काम गोरेगाव पश्चिमच्या भगत सिंहनगर मध्ये शनिवारी केले. ज्येष्ठ कामगार दिवंगत नेते शरद राव यांच्या म्युनिसिपल मजदुर संघ यांच्या अध्यक्ष शशांक राव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटक दिपक सोनावने हे मुंबईतील वेगवेगळ्या भागात जाऊन कामगांराना हक्काची माहीती देत आहे. घरेलु कामगांराना शासना तर्फे 55 वर्षानंतर 10,000 रुपये पेन्शन मिळते, बाळंतपणात 5000 रुपये खर्च मिळतो. अंतविधीला खर्च मिळतो, मुलांन 300 रुपये स्कॉलरशीप मिळते, अशा योजनांची माहीती महिलांना नसते. त्याबरोबरच संघाने शासनाकडे मागणी केली आहे की,10,000 रुपये पेन्शन वाढवुन 25,000 रुपये करावी, घरेलु कामगार महिलांना महिन्यातून 4 सुट्ट्या मिळाव्या, तसंच त्यांच्या हक्काचा कायदा असावा, या हक्काची माहिती महाराष्ट्र घरेलु कामगार युनियन सध्या महाराष्ट्र भर देत आहे, अशी माहीती दिपक सोनावने यांनी मुंबई लाइव्हला दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा