'आरक्षणावरील मराठ्यांचे आक्रमण रोखा'

 BMC office building
'आरक्षणावरील मराठ्यांचे आक्रमण रोखा'

परळ - कुणबी समाजोन्नती संघाच्या ९६ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन परळ येथील शिरोडकर सभागृहात करण्यात आले. 'यावेळी कुणबी समाजोन्नती संघ ही काेकणातील सर्व कुणबी बांधवांची मातृसंस्था आहे', 'या संस्थेची वाटचाल गेल्या ९६ वर्षात ढासळलेली नाही', 'यापुढेही ढासळू नये', 'त्यासाठी ओबीसी आरक्षणावरील मराठ्यांचे आक्रमण रोखणे आणि समाजाची राजकीय अस्तित्वाची लढाई तीव्र करणे', 'हेच आपल्यासमोरील आव्हान आहे', 'यासाठी संपूर्ण ओबीसीने एकत्रितपणे लढा देऊन यापुढील निवडणूक लढवण्यासाठी तयारी करा' असे आवाहन माजी संघाध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केले.

तसेच 'आमचा लढा कोणत्याही जाती- समाजाच्या विरोधात नाही', 'सरकारला कुणाला आरक्षण द्यायचे आहे त्यांना दयावे' 'मात्र आमच्या आरक्षणातून नाही' 'शिवाय आम्ही कुणालाही आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू देणार नाही' तरुणांना अशा घुसखोरी करणाऱ्यांपासून सावध राहाण्याचा इशाराही बावकर यांनी दिला. यावेळी राम शिवगन, संघाध्यक्ष भूषण बरे, नवीमुंबई उपमहापौर अविनाश लाड यांची उपस्थिती होती.

 

 

Loading Comments