Advertisement

Maharashtra budget : महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अधिक लक्ष

Maharashtra budget : महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर
SHARES

यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असून तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे 

 • छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
 • आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी
 • मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये
 • शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये
 • केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजना या योजनेत आणखी सहा हजार रुपयांची भर केंद्र सरकार घालणार. त्यामुळे
 • शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार मिळणार
 • प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
 • प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
 • केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
 • 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
 • 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणारहेही वाचा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीत होण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा