महिला आरक्षित प्रभागांतून उमेदवारीसाठी रस्सीखेच

Khar
महिला आरक्षित प्रभागांतून उमेदवारीसाठी रस्सीखेच
महिला आरक्षित प्रभागांतून उमेदवारीसाठी रस्सीखेच
See all
मुंबई  -  

खार - वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांची धावपळ सुरू झालीये. ज्यांच्या वॉर्डात फेरबदल झाले नाहीत, त्यांचा जीव भांड्यात पडला असला, तरीही नव्याने आरक्षण जाहीर झालेल्या वॉर्डात मात्र असंतोष पसरलाय. एच इस्ट विभागात एक प्रभाग कमी झाल्याचा फटका स्थानिक नगरसेवकांना बसलाय. ८८ हा वॉर्ड शिवसेनेचे नगरसेवक राजू भूतकर यांचा आहे. मात्र हा वॉर्ड महिला आरक्षित झाल्यामुळे त्यांच्या पत्नी उमेदवारीसाठी पुढे सरसावणार असल्याचं दिसतंय. महिला वर्ग आरक्षित झालेल्या जागेवर महिला इच्छुक उमेदवारांनी दावा सांगण्यास सुरुवात केल्याने नेमकं कोणाला तिकिट द्यावं, या गोंधळात सर्वच राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे महिला गटप्रमुख आणि महिला कार्यकत्यांमध्येही रस्सीखेच सुरु झालीये.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.