Advertisement

ऐतिहासिक! पक्षांतरबंदी कायद्यानंतर महापालिकेत पहिल्यांदाच फुटले नगरसेवक


ऐतिहासिक! पक्षांतरबंदी कायद्यानंतर महापालिकेत पहिल्यांदाच फुटले नगरसेवक
SHARES

शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक फोडून या पक्षाचं महापालिकेतील अस्तित्वच जवळपास संपवून टाकलं आहे. पक्षांतरबंदी कायद्यानंतर एकाच पक्षाचा दुसरा गट करून फुटण्याची ही मुंबई महापालिकेतील पहिलीच घटना आहे. यापूर्वी १९९६ मध्ये काँग्रेसचा एक मोठा गट फुटून त्यांनी शिवसेनेला मदतान केले होते. पण हा कायदा होण्यापूर्वी. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा शिवसेनेने केली आहे.

भांडुपच्या पोटनिवडणुकीनंतर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिकेवर आमच्याच पक्षाचा महापौर बसणार असल्याचं जाहीर करताच, त्यांच्या या इशाऱ्याला गंभीरपणे घेत शिवसेनेने दोनच दिवसांमध्ये मनसेच्या ६ नगरसेवकांचा गटच फोडून त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतलं.


काय झालं होतं १९९६ मध्ये?

सन १९९२-९७ च्या महापालिकेत १९९६ ला झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा एक गटच बाहेर पडला आणि त्यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मिलिंद वैद्य यांना मतदान केलं होते. यामध्ये विजय लोके यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यावेळी कोणताही नियम नव्हता. त्यावेळी कितीही नगरसेवक फुटले तरी त्यांच्या पक्षविरोधी कारवाई करता येत नव्हती.

यानंतर २००२-०७ मध्ये सपाचे अस्लम शेख, मोहसीन हैदर, अस्लम शेख यांच्यासह एक गट करून बाहेर पडत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे सपाचे कार्यालयही शिल्लक राहिले नव्हते.


फोडाफोडीला लगाम घालण्यासाठी...

परंतु त्यानंतर या फोडाफोडीच्या राजकारणाला लगाम घालण्यासाठी नियमात सुधारणा करून पक्षाची जी नगरसेवक संख्या असेल त्यातील एक तृतीयांश नगरसेवक आपला गट करून निघून गेल्यास त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करता येवू शकणार नाही, असं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण कमी झाले.

परंतु अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर प्रथमच अशाप्रकारे एका पक्षाचे नगरसेवक एक गट करून फुटल्याची घटना घडल्याचं महापालिकेच्या चिटणीस विभागाचे माजी अधिकारी किशोर वेंगुर्लेकर यांचं म्हणणं आहे. १९९६ मध्ये जेव्हा काँग्रेसचा गट फुटला होता, तेव्हा अशाप्रकारचा नियम नव्हता. परंतु त्यानंतरच हा नियम बनवण्यात आला आणि त्यानंतर अशाप्रकारे एका पक्षाचे जवळपास सर्वच नगरसेवक फुटून जाणं हे प्रथम घडत असल्याचे त्यांनी सांगितलं.


गटाने दिलं पत्र

दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे,परमेश्वर कदम आणि अर्चना भालेराव या सहा नगरसेवकांचा एक गट तयार करून त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र दिल्याचं म्हटले आहे. मात्र, या सहा नगरसेवकांना फोडण्याची छुपी रणनिती आधीपासूनची सुरु होती. परंतु पराभवानंतर शिवसेनेचे विभागप्रमुख अॅड. अनिल परब, मिलिंद नार्वेकर, आमदार संजय पोतनीस यांनी गुरुवारी रात्रीपासून फिल्डींग लावून अत्यंत गोपनीयता राखून सर्वांच्या गटांचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देतानाच संध्याकाळी मातोश्रीवर प्रवेश घडवून आणला.हेही वाचा -

कसली एकनिष्ठा? जाणून घ्या, मनसेची साथ सोडणाऱ्यांची राजकीय पार्श्वभूमी डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा