शिवस्मारकाला कोळीबांधवांचा विरोध

 Mahim Railway Station
शिवस्मारकाला कोळीबांधवांचा विरोध
शिवस्मारकाला कोळीबांधवांचा विरोध
See all

माहिम - 3,600 कोटी रुपये खर्च करुन समुद्रात महाराष्ट्र शासन "शिवस्मारक" उभारत आहे. तसेच दोन हेलीपॅडही उभारले जाणार आहेत. त्यामुळे मासेमारी धंद्यावर कायमस्वरुपी विपरीत परिणाम होईल, म्हणून कोळी संघटना, संस्था या स्मारकाला विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी सायंकाळी माहिम मच्छीमार नगरात, सेंट झेव्हिअर्स कॉलेजच्या प्रांगणात कोळी समाजातील बांधवांनी माध्यमांपुढे एकत्र येऊन आपली मत मांडण्याचा प्रयत्न केला. हे नियोजित शिवस्मारक अन्य ठिकाणी बांधावे आणि उद्घाटन सोहळ्याचा निषेध करण्यासाठी कोळीबांधव एकत्र आले होते. माहिम मांगेला समाजाचे युवा अध्यक्ष कल्पेश दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी हे कोळीबांधव एकत्र आले होते.

Loading Comments