सोमय्या पुराव्याशिवाय आरोप करतात - शेवाळे

 Mumbai
सोमय्या पुराव्याशिवाय आरोप करतात - शेवाळे
Mumbai  -  

दादर - आम्ही करून दाखवलेल्या गोष्टींचा कसला दाखवता जाहीरनामा असे म्हणत महापालिकेने केलेल्या कामाच्या आधारावर भाजपाने जाहीरनामा सादर केल्याचा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी केला. तसेच किरीट सोमय्या हे पुराव्यांशिवाय आरोप करत आहेत. महापालिका निवडणुकीत हार निश्चित असल्याचे जाणवल्यामुळे सोमय्या आरोप करत असल्याचा घणाघात शेवाळे यांनी केला.

शेखर वैष्णव हे पत्रकार परिषदेत सोबत असतात. कारण त्यांच्याकडे सोमय्या यांच्याविरुद्ध पुरावे आहेत. वैष्णव आणि शिवसेना पक्ष यांच्यात कोणतेही राजकीय नाते नाही. वैष्णव त्यांच्या मर्जीने सोबत आहेत. भाजपाचा सामना करण्याची ताकद शिवसेनेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. तसेच एवढंच वाटत असेल तर केंद्रातील ताकद वापरून शिवसेनेची संपत्ती मोजा, आम्ही तयार आहोत असं सांगत अमित शहा यांची संपत्ती भाजपाने जाहीर करावी असं आव्हान राहुल शेवाळेंनी दिलं.

Loading Comments