भायखळा - कस्तुरबा रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस, भायखळाच्या वतीनं रुग्णांना फळवाटप करण्यात आलं. मधुकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी येथील रुग्णांना होणारा त्रास आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.