Advertisement

शिवसेना नेत्यांची नावं मुंबई-पुण्यातच शोभतील, श्रीहरी अणे यांची टीका

एका फेसबुक पोस्टद्वारे अणे यांनी बाळासाहेबांचं नाव महामार्गास देण्यास विरोध दर्शवतानाच हिम्मत असेल तर सदाशीव पेठेचं नाव ठाकरे पेठ करून दाखवा, असं म्हणत शिवसेनेला डिवचलंही आहे.

शिवसेना नेत्यांची नावं मुंबई-पुण्यातच शोभतील, श्रीहरी अणे यांची टीका
SHARES

महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी जोरदार विरोध केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी विदर्भासाठी काहीच केलं नाही. या एका कारणासाठी तरी सेना नेत्याचं नाव विदर्भात नको. त्यांची नावं मुंबई-पुण्यातच शोभतील, अशा तिखट शब्दांत अणे यांनी आपली प्रतिक्रिया देत नाव बदलण्यास विरोध दर्शवला आहे.


शिवसेनेला डिवचलं

एका फेसबुक पोस्टद्वारे अणे यांनी बाळासाहेबांचं नाव महामार्गास देण्यास विरोध दर्शवतानाच हिम्मत असेल तर सदाशीव पेठेचं नाव ठाकरे पेठ करून दाखवा, असं म्हणत शिवसेनेला डिवचलंही आहे.


विरोध मावळला?

समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शिवसेनेकडूनच या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची मागणी होत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर शिवसेनेचा विरोध मावळला की काय अशी चर्चाही सुरू आहे.

दुसरीकडे समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी याचं नाव देण्याची भाजपाची तयारी आहे. असं असताना आता शिवसेनेच्या मागणीला अणे यांनी विरोध केला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या नावावरून येत्या काळात मोठाच वाद रंगण्याची शक्यता आता दाट झाली आहे.


आश्वासनाचा विसर

बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भ राज्याचं वचन पाळलं नाही, त्यांच्या नंतरच्या नेत्यांनाही विदर्भ राज्याच्या आश्वासनाचा विसर पडला. त्यामुळं त्याचं नाव नको असं म्हणत अणे यांनी समृद्धी महामार्ग योग्यच असल्याचं म्हटलं आहे. तर गरज पडलीच तर विदर्भ महामार्ग वा विदर्भ ज्यांची कर्मभूमी होती त्या महात्मा गांधीचं नाव महामार्गाला द्यावं, असं अणे यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा-

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, शिवसेनेची मागणी

अयोध्येत उद्धव ठाकरे हिंदीतून तासभर भाषण करणार?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा