Advertisement

कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन


कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन
SHARES

मुंबईतल्या कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. अटल बिहारी यांच्या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम केलं होतं. कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते.


जॉर्ज फर्नांडिस यांचा अल्पपरिचय

जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म जून १९३० साली झाला. मंगलोरी कॅथलिक ख्रिश्चन कुटंबात त्यांचा जन्म झाला. सहा भावंडांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे सर्वात मोठे होते. वयाच्या १९ व्या वर्षी हॉटेल आणि वाहतुक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचं काम त्यांनी केेलं. १९४९ मध्ये जॉर्ज फर्नांडिस नोकरीच्या शोधात मुंबईत आले. सुरूवातीचे त्यांचे दिवस अत्यंत खडतर गेले. पुढे कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले. त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला.


जॉर्ज फर्नांडिस यांची कारकिर्द

  • जॉर्ज फर्नांडिस यांनी १९६७ साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का. पाटील यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र १९७१च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.
  • १९७४ साली त्यांनी रेल्वे कर्मचारी संपाचं नेतृत्व केलं होतं.
  • आणीबीणाच्या कालावधीत त्यांच्यातील खरा लढवय्या पाहायला मिळाला. इंदिरा गांधी सरकारचा त्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी एक आरोपी म्हणून तुरुंगवासही भोगला होता.
  • १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम पाहिलं
  • विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा