Advertisement

काँग्रेसला झटका, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह भाजपात

बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह अडचणीत आले होते. तेव्हापासून ते सक्रिय राजकारणातून बाहेर फेकले गेले होते.

काँग्रेसला झटका, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह भाजपात
SHARES

काँग्रेस नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 

कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला काही प्रमाणात फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह अडचणीत आले होते. तेव्हापासून ते सक्रिय राजकारणातून बाहेर फेकले गेले होते. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरसाठीचे कलम 370 व 35A हटविण्यात आल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामाही सोपवला होता. त्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांशी घरोबा निर्माण केला होता. 

भाजपमध्ये प्रवेशावेळी कृपाशंकर सिंह म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मला कधी अडचणीत आणले नाही. मंत्री असताना ते प्रश्न विचारायचे. मी सांगायचो की नंतर उत्तर देतो ते मान्य करायचे. मी ठरवले की जर मला राजकारण करायचे असेल तर ते भाजपमध्येच करेन. तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास दाखवा मी तो पूर्ण करेन. अनेकांचे मला भाजप प्रवेश कधी करणार यासाठीचे फोन गेल्या काही दिवसात येत होते. पण माझे एकच उत्तर होते, ते म्हणजे जेव्हा भाजप पक्षाला वाटेल तेव्हा मी भाजप प्रवेश करेन. त्यानुसारच मी गेले अनेक दिवस धीर धरला आणि अखेर भाजप प्रवेशाचा तो दिवस आज उजाडला.हेही वाचा -

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  1. महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा