सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील (Former MP Sanjaykaka Patil) आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील (Nishikant Bhosale Patil) यांनी आज अजित पवार (ajit pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत (mumbai) त्यांचा पक्षात समावेश केला.
इस्लामपूरमधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निशिकांत भोसले पाटील यांना उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यांनी पक्षात प्रवेश करताच राष्ट्रवादीने त्यांचे उमेदवार म्हणून त्यांची घोषणा केली.
निशिकांत पाटील इस्लामपूरमधून पक्षाचे प्रतिनिधित्व करतील आणि संजयकाका पाटील तासगाव विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रतिनिधित्व करतील. या नेत्यांच्या समावेशामुळे सांगली विभागातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची पकड मजबूत होणार आहे.
हेही वाचा