Advertisement

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

दुपारी २ च्या सुमारास अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
SHARES

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे रात्री 2 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महाडेश्वर यांनी 63व्या वर्षी अखेरचा श्वास  घेतला आहे. त्यांच्या  जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे.

महाडेश्वरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात आले होते. गेल्या चार पाच दिवसांपासून महाडेश्वर यांची तब्येत बरी नव्हती. दोन दिवसांपूर्वी  सिंधुदुर्गातील कणकवली गावाहून मुंबईत आले होते.

2017 ते 2019 दरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं होते. विश्वनाथ महाडिक यांचा लग्नाच्या वाढदिवशीच निधन झाले. विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच ते स्थायी समितीचे सदस्य होते.

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.

 • 2002 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवड
 • 2003 मध्ये मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड
 • 2007 मध्ये मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले.
 • 2012 मध्ये मुंबई महापालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले.
 • 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या महापौरपदी निवड   हेही वाचा

  संजय राऊत १० जूनपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणार, नितेश राणेंचा दावा

  Read this story in English or हिंदी
  संबंधित विषय
  ‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा