जोगेश्वरीत मित्रांची व्हिक्ट्रीसाठी काँट्री!

    मुंबई  -  

    जोगेश्वरी -  मित्रांनी पैसे जमवून पार्टी करणं हे काही आपल्यासाठी नवं नाही. पण काही मित्रांनी पैसे जमवून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर? हे खरं आहे. निवडणुका म्हणजे सारा पैशांचा खेळ, सामान्य माणसाचं काम नाही असाच साधारण समज. पण हे खोटं ठरवलंय जोगेश्वरीच्या प्रभाग ७७ मधल्या मयुर मोरये या अपक्ष उमेदवारानं. मोरयेसाठी त्याच्या मित्रमंडळींनी पैसे जमवून प्रचार सुरु केलाय. या वॉर्डमध्ये बऱ्याच वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र सत्ताधारी या विभागाचा विकास करू न शकल्याने या विभागातील तरुण एकत्र आलेत आणि त्यांनी त्यांच्यामधलाच एक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलाय.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.