Advertisement

सहाय्यक आयुक्तांच्या बदली प्रकरणी नगरसेवक आक्रमक


सहाय्यक आयुक्तांच्या बदली प्रकरणी नगरसेवक आक्रमक
SHARES

बोरीवली - आर मध्य पालिका कार्यालयतील सहाय्यक आयुक्त किशोरकुमार गांधी यांच्या तडकाफडकी बदलीमुळे शिवसेना, मनसे आणि काँग्रेस आक्रमक झालंय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रभाग समिती बैठकीत आवाज उठवत बैठक तहकूब करत उपोषणाचे अस्त्र उपसले. जोपर्यंत गांधी यांची बदली मागे घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय. दरम्यान आज प्रभाग समितीची बैठक असताना कोणीच वाली नसल्यामुळे आणि पालिका उपायुक्त अशोक खेरे सुट्टीवर असल्यामुळे भाजप वगळता सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून निषेध नोंदवला. तत्पूर्वी ४ नोव्हेबर रोजी पालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन गांधी यांची बदली रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली होती मात्र कोणत्याही प्रकारची दखल न घेतली गेल्यामुळे ५ नोव्हेंबरला बोरिवली येथील आर मध्य विभागात आंदोलन करण्यात आले होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा