उद्यानाच्या लोकार्पणावरून शिवसेनेत वाद

Sham Nagar, Mumbai  -  

जोगेश्वरी - अनेक वर्षांपासून रखडलेल्या श्री स्वामी समर्थ उद्यान आणि व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा सोमवारी आहे. या सोहळ्याला युवासेना नेता आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे चांगलीच लगबग सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना कार्यकर्ते सुरेंद्र घोणे यांनी उद्यानाच्या उद्घाटनाला एवढा उशीर का झाला, असा प्रश्न उपस्थित केला. स्थानिक नगरसेविका शिवानी परब यांच्या निधीतून हे उद्यान बांधण्यात आलंय. उद्यानासोबतच नागरिकांच्या फिटनेससाठी जिमही बांधण्यात आली. त्यामुळेच या उद्घाटनाला उशिर झाल्याची प्रतिक्रीया देत शिवानी परब आणि शैलेश परब यांनी आरोपांचं खडंण केलंय. उद्घाटन सोहळ्यापूर्वीच स्वपक्षीयांच्या विरोधानं शिवसेनेच्या स्थानिक गोटात चलबिचल झालीये, हे मात्र खरं.

Loading Comments