उद्योजक गौतम अदानी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
तसेच ही भेट अशावेळी झाली, जेव्हा आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी काही वेळापूर्वी वर्सोवा सी लिंकवरुन राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून कसं दूर लोटलं जात आहे, असे आरोप करत होते.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मागील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारने बहुचर्चित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तीन बैठका घेतल्या होत्या. तेव्हापासून या प्रकल्पासाठी अदानी समूहाचे नाव चर्चेत होते.
ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी नेस्को मैदानावर केलेल्या भाषणात धारावी पुनर्विकासाबाबत राज्य सरकारच्या निर्णयाचा उल्लेख केला. “धारावीला देशाचे प्रमुख आर्थिक केंद्र बनवणे हे आमचे ध्येय आहे. मी तुम्हा सर्वांना खात्री देतो की शिवसेना ते प्रत्यक्षात आणेल,” ते म्हणाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी आणि ठाकरे यांच्यातील भेट ही राजकीय किंवा व्यवहारीक नव्हती. अदानी समूहाचे मुंबईतील काही मोठे व्यावसायिक हितसंबंध आहेत, जसे की छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे अदानी समूहाद्वारे चालवले जात आहे. तर अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ही मुंबईतील प्रमुख वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
हेही वाचा