Advertisement

'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर..., तृतीयपंथीयानं निलेश राणेंना सुनावलं

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना 'हिजडा' असं संबोधण्यावर तृतीयपंथिय असलेल्या सारंग पुणेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर..., तृतीयपंथीयानं निलेश राणेंना सुनावलं
SHARES

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांवर कडाडून टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी त्यांनी टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्याचं बोललं जातंय. प्राजक्त तनपुरे यांना त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये ‘हिजडा’ असं संबोधलं. आता यावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.


राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना 'हिजडा' असं संबोधण्यावर तृतीयपंथिय असलेल्या सारंग पुणेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना सुनावलं आहे.  

सारंग पुणेकर यांनी ट्विटमध्ये महटलं आहे की, 'हिजडा' या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिशबुद्धी जगाला दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरवैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा सारंग पुणेकर यांनी दिला आहे.

सारंग पुणेकर यांची 'हिजडा' या शब्दावर आपत्ती आहे. हा तृतीयपंथियांचा अपमान आहे. निलेश राणे यांनी हा शब्द मागे घेतला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर देखील निलेश राणेंनी टीका केली होती. झालं असं की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहलं होतं. पत्रात त्यांनी साखर उद्योगाला वाचवा असं नमूद केलं होतं. त्याच संदर्भातील एक ट्विट निलेश राणे यांनी केलं होतं. या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी म्हटलं की, साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??

यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी.

रोहित पवार यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना निलेश राणे म्हणाले होते की, मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही... कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी.



हेही वाचा

जनतेत विश्वास निर्माण होण्यासाठी ‘हे’ करा, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना सूचना

माझा मेडिकल रिपोर्ट ‘यांनी’ लपवला- जितेंद्र आव्हाड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा