एन वॉर्डमध्ये अपक्षांची लढत

 Mumbai
एन वॉर्डमध्ये अपक्षांची लढत

घाटकोपर - निवडणुकीत अनेकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे बहुतांश इच्छुक उमेदवार हे दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर आहेत. पण, एन वॉर्डमध्ये काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळते. बड्या पक्षातून उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे न जाता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवणार असल्याचं चित्र पाहायला मिळते.

प्रभाग 127 हा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला असून  एकूण 13 अपक्ष उमेदवार इथे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे प्रभाग 133 हा देखील खुला प्रवर्गासाठी राखीव असून येथून 12 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. तसेच प्रभाग 124 महिलांसाठी आरक्षित असल्याने 9 अपक्ष महिला निवडणुकीसाठी उभ्या आहेत. बड्या पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी दुसऱ्या बड्या पक्षात जाण्याऐवजी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे.

Loading Comments