गोरेगाव - गोरेगाव पूर्वमधील फ्लायओव्हर सोसायटी आणि राजीव गांधी नगर परिसरात मनसेच्या वतीनं मोफत दंत चिकित्सा आणि त्वचा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. 110 पेक्षा जास्त नागरिकांना या शिबिराला भेट देऊन तपासणी करून घेतली. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यत सगळ्यांनीच या शिबिरात भाग घेतला. या शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मनसे उपशाखाध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितलं.