रमेश सिंग ठाकूर यांचा राजीनामा

 Pali Hill
रमेश सिंग ठाकूर यांचा राजीनामा

कांदिवली – काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले कांदिवलीचे माजी आमदार रमेश सिंग ठाकूर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच मुंबई विभागीय कार्यसमितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी संजय निरुपम यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दिल्लीपर्यंत गेलेल्या या प्रकरणानंतर कामत यांनी माघार घेतली. मात्र ठाकूर यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे .रमेशसिंग ठाकूर हे 2009 ते 2014 या कालावधीत काँग्रेसचे कांदिवलीचे आमदार म्हणून कार्यरत होते. त्याआधी ते 20 वर्षे नगरसेवक पदावर होते. गेल्या दीड वर्षांपासून मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यवर ते नाराज असल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. निरुपम ज्येष्ठ नेत्यांना डावलून अंतर्गत गटबाजी करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

ठाकूर यांचा राजीनामा स्वीकारल्यास कांदिवली पूर्वेकडील काँग्रेसचे नगरसेवक ठाकूर यांच्यासोबत भविष्यात भाजपाच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.

Loading Comments