खासदारांनी घेतली नवनिर्वाचित नगरसेवकाची ‘शाळा’

 Mumbai
खासदारांनी घेतली नवनिर्वाचित नगरसेवकाची ‘शाळा’

कांदिवली - निवडणुकीपूर्वी सर्वच नेतेमंडळी आश्वासनं देतात, मात्र निवडणुकीनंतर या नेत्यांना त्यांनी दिलेल्या सर्व आश्वासनांचा विसर पडतो. इतकंच नाही तर ते तिथे कधी तोंड दाखवायलाही येत नाहीत. यामुळे नेहमीच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याचाच प्रत्यय कांदिवलीतल्या वॉर्ड क्रमांक 31 मध्ये आलाय. इथे असलेल्या पृथ्वीराज चौहान हे उद्यान एकेकाळी विकसित आणि हिरवळीने बहरलेलं होतं. मात्र आज या उद्यानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

या उद्यानात मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र या उद्यानाच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बुधवारी सकाळी अचानक खासदार गोपाळ शेट्टींनी या उद्यानाला भेट दिली. तेव्हा तिथल्या रहिवाशांनी या संदर्भात गोपाळ शेट्टींकडे तक्रार केली. इथे असलेल्या झाडांना पाणी देखील दिलं जात नाही. तसेच खासदारांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या आसनेही तुटलेल्या अवस्थेत असल्याचं या नागरिकांनी सांगितलं. तेव्हा शेट्टींनी इथल्या नवनिर्वाचित भाजपाचे नगरसेवक कमलेश यादव यांची चांगलीच शाळा घेतली.

Loading Comments