गृहखरेदीदारांना केंद्राची दिवाळी भेट

 Pali Hill
गृहखरेदीदारांना केंद्राची दिवाळी भेट

मुंबई - केंद्र सरकारनं गृहनिर्माण नियामक प्राधिकरण कायद्याची अधिसूचना जारी करत सोमवारी गृहखरेदीदारांना दिवाळी भेट दिली आहे. अधिसूचना जारी झाल्यानं 1 नोव्हेंबरपासून केंद्रशासित प्रदेशात हा लागू झाला आहे. तर महाराष्ट्रासह इतर राज्यात सहा महिन्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या कायद्यानुसार आता ग्राहकांचे हित जपले जाणार असून फसव्या बिल्डरांना चाप बसणार आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर आता सरकारी नियंत्रण राहणार आहे. 'हा कायदा गृहखरेदीदारांना दिलासा देणारा आणि बांधकाम व्यवसायात पारदर्शकता आणणारा असल्याचं म्हणत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य आनंद गुप्ता यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

असा आहे कायदा

-प्रकल्प पूर्णात्वाची डेडलाइन पाळावी लागणार

-डेडलाइन चुकल्यास एका वर्षांची मुदत मिळणार, पण त्यानंतर ही प्रकल्प पूर्ण न झाल्यास प्रकल्पाच्या 10 टक्के दंड भरावा लागणार

-प्रकल्पाची सर्व माहिती वेबसाइटवर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक

-आधी नोंदणी मगच प्रकल्पाची जाहिरात

-ग्राहकांनी अदा केलेल्या घरांच्या रकमेतील 70 टक्के रक्कम विशिष्ट खात्यात जमा करणे बंधनकारक

-घराची खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांनाही बसणार चाप

-दलालांनाही नोंदणी बंधनकारक

-सीसी मिळालेल्या मजल्यांची करता येणार विक्री

Loading Comments