संघाच्या आदेशाने चालते राज्य सरकार - अशोक चव्हाण

  Mumbai
  संघाच्या आदेशाने चालते राज्य सरकार - अशोक चव्हाण
  मुंबई  -  

  सीएसटी - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रीय स्वयंमसेवक संघावर टीका केलीय. राज्य सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे राज्य सरकार आरक्षणविरोधी असल्यानेच मराठा समाजाला आरक्षण देत नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.

  "काँग्रेस सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला टिकवता आले नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात पूर्ण ताकद लावून लढणे आवश्यक आहे. परंतु ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार आणि आदेशाने राज्यातील सरकार चालते, त्या संघाचा आरक्षणाला विरोध असल्याने राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चालढकल करत आहे. मराठा समाजाने राज्यभरात केलेल्या चक्काजाम आंदोलनाची योग्य ती दखल घेऊन सरकारने मराठा आणि मुस्लीम समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे," अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.