अखेर गुरुदास कामत नरमले

 Mumbai
अखेर गुरुदास कामत नरमले

मुंबई - काँग्रेसच्या एकाधिकार कारभारावर नाराज असलेले माजी खासदार गुरुदास कामत हे प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आपण प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष यांच्या एकाधिकार कारभारामुळे गुरुदास कामत यांनी निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काँग्रेसचे पक्ष निरीक्षक भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या प्रयत्नांनी गुरुदास कामत यांची मनधरणी झाली असल्याचं सांगितलं जातंय. गुरुदास कामत नाराज झाल्यानंतर नारायण राणे, नसीम खान, कृपाशंकर सिंह यांनीही प्रचारापासून दूर राहणार असल्याचं स्पष्ट केलं. पण, आता पुन्हा एकदा गुरुदास कामत निवडणुकीत सक्रिय झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Loading Comments