यूएस निवडणुकांसाठी मुंबईत हवन

कांदिवली - अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम यांच्या विजयासाठी ठाकूर कॉम्प्लेक्स इथं पूजा हवनचं आयोजन केलं होतं. विष्णुधाम ट्रस्टच्या वतीनं या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेत राहणाऱ्या एनआरआय भारतीयांनी पत्र लिहून या पूजेसाठी विनंती केली होती. जर डोनाल्ड ट्रम जिंकले तर भारतासोबतचे अमेरिकेचे संबंध सुधारतील. याचा फायदा भारतीयांना होईल, असा विश्वास अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे भारतीयांमध्ये त्यांच्या विषयी विश्वास अधिक वाढला. याच कारणास्तव मुंबईत पूजा केली गेली. 

Loading Comments