Advertisement

भानूशालींची उमेदवारी निश्चित झाल्याने शिवसेना कार्यकर्ते आक्रमक


भानूशालींची उमेदवारी निश्चित झाल्याने शिवसेना कार्यकर्ते आक्रमक
SHARES

घाटकोपर - भाजपातून सोमवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेल्या मंगल भानूशाली यांना शिवसेनेतून तिकीट कन्फर्म झाल्याने शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले आहेत. भानूशाली वॉर्ड क्रमांक 131 मधून निवडणूक लढवणार असल्याची कुणकूण लागताच नाराज झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी भानूशाली पंतनगर येथील शिवसेना शाखा क्रमांक 131 मध्ये येत असताना त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना झाले. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, शाखा क्रमांक 131 येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा