गोवंडीत शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाचा राजीनामा

 Chembur
गोवंडीत शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाचा राजीनामा
Chembur, Mumbai  -  

गोवंडी - समाजवादी पार्टीतून 2012 मध्ये महापालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक बनलेले शिवाजीनगर येथील शांताराम पाटील हे सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांना उपविभागप्रमुख पद दिले. शिवसेनेकडून पालिका निवडणुकीची उमेदवारी देखील देण्यात येईल असे अश्वासन त्यांना देण्यात आले होते. मात्र त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला. शांताराम पाटील यांनी या प्रभागातून त्यांच्या सुनेला तिकीट मिळावे अशी मागणी केली होती. मात्र पक्षाकडून हे तिकीट दुसऱ्याच महिलेला मिळाल्याचे बुधवारी पाटील यांना समजले. त्यामुळे त्यांनी पत्राद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी उपविभागप्रमुख पदाचा राजीनामा पाठवला आहे.

Loading Comments