Advertisement

लष्कराच्या मदतीने उभारणार रुग्णालय- ठाकरे सरकारचा नवा प्रस्ताव


लष्कराच्या मदतीने उभारणार रुग्णालय- ठाकरे सरकारचा नवा प्रस्ताव
SHARES

पुढील १५ दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवताना सुसज्ज रुग्णालय उभारण्याची गरज भासल्यास त्यासाठी लष्कराची मदत घेतली जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले. महाराष्ट्रात सध्या कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या आता ९७ वर जाऊन पोहचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्यात संचारबंदी जाहिर करत सर्व जिल्हा आणि राज्याच्या सीमा आता बंद केल्या आहेत. 

हेही वाचाः- संचारबंदीचा गुढीपाडव्याच्या बाजाराला फटका

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ट्रॅकिंग अँण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सूचना देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, विषाणूंच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किट्स, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता याकडे लक्ष द्यावे. मोठय़ा प्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठय़ा प्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घेण्यात यावे.

हेही वाचाः- भाजीआवक बंद, भाजीपाला महागण्याची शक्यता

चीनमध्ये अवघ्या काही तासात रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि युद्घस्तरावर ते उभारण्यातही आले होते. आपल्याला त्यांच्यासारखे काम करण्यासाठी कित्येक महिने लागतील, असे वक्तव्य त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले होते. मात्र, राज्यातील आणीबाणीची स्थिती पाहता गरज भासल्यास आपणही लष्कराच्या मदतीने सुसज्ज रुग्णालय कोरोनाबाधितांसाठी उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या धोकादायक उंबरठय़ावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

देशांतर्गत विमानसेवा ही बंद

देशात कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत केंद्रीय नागरी उड्डाण संचालनालयाने मंगळवारी मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमान वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून विमानांच्या उड्डाणांवर ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, कार्गो विमानांना मात्र या निर्णयातून वगळण्यात आले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा