बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv sena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यातील युद्ध आणखीन चिघळले. दोन्ही गटांनी शिवसेनेच्या ब्रँडवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
पक्षाचे चिन्ह (Dhanushyban) कोणाला मिळणार आणि अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (BMC) कोणाला मिळणार यावर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दोन्ही गटांतील राजकीय लढाईचे फलित ठरणार असले तरी दसरा मेळाव्यासारख्या घटना या दोन गटांत लढण्याचे मैदान बनले.
56 वर्षांची परंपरा
या सगळ्यात, शिवसेनेच्या पहिल्या जाहीर सभेला ५६ वर्षे पूर्ण होत असताना, पक्षाला इतिहासातील सर्वात कठीण, आणि शक्यतो सर्वात निर्णायक क्षणाचा सामना करावा लागत आहे.
दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी एक ५६ वर्षांची परंपरा आहे. परंतु या सर्व वर्षांत शिवसेनेला एक चळवळ आणि पक्ष म्हणून आकार देण्यातही दसरा मेळाव्याने मोठी भूमिका बजावली.
19 जून 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी (Bala Saheb Thackeray) सुरू केलेल्या चळवळीला औपचारिकपणे शिवसेना (शिवाजीची सेना) असे नाव देण्यात आले. या चळवळीला पूर्वीच्या मुंबईतील तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि ठाकरे यांनी शिवसेनेचा पहिला सार्वजनिक मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर घेण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या जाहीर सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यायामशाळा (GYM), मित्रमंडळे (सांस्कृतिक गटांना) भेट देण्याचे ठरवले आणि अनेक खो-खो आणि कबड्डी गटांनाही भेट दिली. अनेक तरुणांना भेटून त्यांना यामागचे कारण सांगितले. शिवसेना उभी करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला.
मेळाव्याचा पहिलाच प्रयत्न, त्यात सणाचा दिवस म्हणजे घरोघरी सुरु असलेली लगबग आणि सोबतीला प्रचंड अवाढव्य असे शिवाजी पार्क! अशा अनेक कारणांमुळे गर्दी झालीच नाही तर? हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
'असा' रंगला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा
काहीही झालं तरी पहिला मेळावा दणक्यात व्हायला हवा, रंगाचा बेरंग झाला तर त्याचा परिणाम पक्षावर होईल या एकाच विचाराने त्यांनी तडक शाहीर साबळेंना बोलावणं धाडलं.
शाहिरांच्या खड्या आवाजात ‘महाराष्ट्र गीत’ सुरू झालं आणि पाहता पाहता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांची पावलं पार्काकडे वळली. यात बाळासाहेबांनी आणखी एक युक्ती केली. दसऱ्याच्या निमित्ताने अनेक कलाकारांचे कार्यक्रम, कसरतीही आयोजित केल्या गेल्या, त्यामुळे महिला कार्यकर्त्या, तरुण मुलं यांनीही पार्काकडे गर्दी केली.
ठाकरे आणि त्यांचे वडील प्रबोधनकार यांना ऐकण्यासाठी तरुणांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे शिवाजी पार्कचे मैदान कार्यक्रमाच्या दिवशी लोकांच्या गर्दीने भरले असल्याने त्यांची रणनीती कामी आली.
सेनेच्या शाखांद्वारे (स्थानिक शाखा) जनसमुदायीकरणाचा हा सराव नंतर प्रतिरूपित करण्यात आला आणि शिवसेनेने अशा हायपरलोकल सामाजिक-सांस्कृतिक उपस्थितीद्वारे लोकांच्या घरात प्रवेश केला.
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आजही मराठी माणसं लक्षात ठेवतात यामागे अनेक कारणं आहेत. या पहिल्या मेळाव्यात मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणा-या शिवसेनेने आपली भुमिका अधिक स्पष्ट केली होती.
महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत आणि मराठी लिहिता-वाचता किंवा चांगले मराठी बोलता येते अशा व्यक्तीलाच राज्य सरकारने सरकारी नोकऱ्या द्याव्यात अशी बाळासाहेबांनी मागणी केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यात, घराघरात शिवसेनेचे कार्यकर्ते घडू लागले.
त्यानंतरही बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी पाठपुरावा सुरुच ठेवला.
अशारितीने शिवसेनेचा पहिला मेळावा, ज्याला गर्दी होईल का? हा प्रयत्न यशस्वी होईल का? अशी शंका बाळासाहेबांना वाटत होती, त्या मेळाव्याने राजकीय इतिहासात एक नवी परंपरा सुरु केली.
23 ऑक्टोबर 1966 रोजी दसरा असल्याने शिवसेनेने मराठी तरुणांना कृती करण्याचे आवाहन केले. “हेच आमचे खरे सीमोल्लंघन (सीमा ओलांडणे) कारण आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत,” अशी घोषणा प्रबोधनकार ठाकरे यांनी केली.
तर बाळ ठाकरेंनी अशी घोषणा केली की, “मराठी माणूस जागा झाला आहे, आणि आतापासून तो कधीही अन्याय सहन करणार नाही.”
दसरा मेळावा ठरला कौटुंबिक संमेलन
वर्षानुवर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा मोठा होत गेला. मराठी आणि हिंदू एकतेची हाक, ठाकरेंची अभ्यासपूर्ण भाषणे, कृतीचे आवाहन आणि शिवसैनिकांना एकत्र येऊन शत्रूशी लढण्याचे आवाहन या सर्व कारणामुळे दसरा मेळावा कौटुंबिक संमेलन झाले.
17 ऑक्टोबर 2010 रोजी आयोजित मेळाव्यात, ज्येष्ठ ठाकरे यांनी त्यांचा नातू आदित्यच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा केली. त्याचप्रमाणे, 2012 मध्ये, रेकॉर्ड केलेले त्यांचे शेवटचे दसरा भाषण ठरले, त्यांनी येत्या काही वर्षांत त्यांचा मुलगा उद्धव आणि आदित्य यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी सैनिकांना केले.
“शिवसेनेची निष्ठा अबाधित ठेवा. उद्धव आणि आदित्य यांची काळजी घ्या, महाराष्ट्राची भरभराट व्हावी यासाठी सुरू ठेवा,” ते म्हणाले होते.
हेही वाचा